पुणे – बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चन सध्या आपल्या आगामी “दसवी’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचे शूटिंग आग्रा येथे करण्यात येत आहे. यात अभिषेक हा एका दबंग नेत्याची भूमिका साकारत आहे. याच दरम्यान, चित्रपटातील एक नवीन लुक इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.
View this post on Instagram
या नवीन लुकमध्ये अभिषेक बच्चन हा एकदम दबंग स्टाइलमध्ये दिसून येत आहे. एका भल्या मोठ्या लाल रंगाच्या पालखीत तो बसलेला असून ती काही लोकांनी उचलून धरलेली आहे. यात तो पांढऱ्या रंगाची पगडी, गॉगल आणि कुर्ता-पाजामामध्ये ऐटीत बसलेला दितस आहे.
View this post on Instagram
आपला लुक शेअर करत अभिषेकने लिहिले की, ‘दसवीचा दहावा दिवस’ अभिषेकच्या या नवीन लुकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तसेच सोशल मीडियावर अभिनेत्याचा हा अंदाज ट्रेंड झाला आहे. चित्रपटात अभिषेक बच्चनसोबत यामी गौतम आणि निमरत कौर मुख्य भूमिका साकारत आहे.
View this post on Instagram
या चित्रपटातून तुषार जलोटा हे प्रथमच दिग्दर्शन करणार आहे. यात अभिषेक हा राम चौधरी नामक व्यक्तीची भूमिका साकारत आहे. जो एक दबंग आणि प्रभावशाली नेता आहे. वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास अभिषेक ‘बॉब बिस्वास’ आणि ‘द बिग बुल है’ चित्रपटातही झळकणार आहे.