दिल्ली : निर्भयाच्या आरोपीला फाशी देण्यासंदर्भात दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टात सुनावणी सुरू झाली आहे. संपूर्ण देशाचे लक्ष खटल्याकडे लागले आहे.
आज कोर्टात होणारी सुनावणी महत्वाची आहे. चारही दोषींना फाशी देण्यासाठी कोर्ट डेथ वॉरंट जारी करू शकत. या प्रकरणात आतापर्यंत सर्व दोषींनी त्यांचे सर्व कायदेशीर अधिकार वापरले आहेत.आरोपीच्या गेल्या एका महिन्यात तीन याचिका सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि पटियाला हाऊस कोर्टातून फेटाळल्या गेल्या आहेत.
16 डिसेंबर 2012 रोजी चालत्या बसमध्ये निर्भया (नाव बदलले) याच्यावर सामूहिक बलात्कार झाला होता. यात निर्भयाचा मृत्यू झाला. या घटनेने देशभरात तीव्र निदर्शने झाली होती. या प्रकरणात सहा आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यापैकी 11 मार्च 2013 रोजी राम सिंह नावाच्या मुख्य आरोपीने तिहार कारागृहात आत्महत्या केली होती. तर दुसरा आरोपी अल्पवयीन होता. त्याला कारवाईनंतर सुधारगृहात पाठविण्यात आले.
याखेरीज अन्य चार आरोपी अक्षय कुमार सिंग, विनय शर्मा, मुकेश आणि पवन गुप्ता हे तिहार तुरुंगात बंद आहेत. या चार आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.