तेहरान : शुक्रवारी इराकमध्ये अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मरण पावलेले इराणचे लष्करप्रमुख कासिम सुलेमानी यांच्या अंत्यसंस्कारात चेंगराचेंगरी झाली आहे.
आतापर्यंत 30 लोकांच्या मृत्यूची माहिती मिळते आहे तर 40 लोक जखमी झाले आहेत. सुलेमानी यांच्या अंत्यसंस्कारासाठी मोठ्या संख्येने लोक जमले होते त्यावेळी ही घटना घडली.
AFP: Iran designates all US forces 'terrorists' for killing General Qassem Soleimani pic.twitter.com/UHeWXmgeDe
— ANI (@ANI) January 7, 2020
त्याचा मृतदेह इराकहून प्रथम अहवाज, नंतर तेहरान आणि आता केरमन येथे आणण्यात आला . त्यांचे अंत्यसंस्कार येथे होतील.
त्याच्या अंत्यसंस्कारात सामील होण्यासाठी देशातील कित्येक भागातून लोक एकत्र येत आहेत. यापूर्वी अहवाज आणि तेहरानमध्ये मोठ्या संख्येने लोक जमा झाले होते.
(सविस्तर बातमी प्रतीक्षेत)