पश्चिम बंगालधील राणावत रेल्वे स्टेशनवर लता मंगेशकर यांचा आवाजातील गाणे गाणारी रानू मंडल या महिलेचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी चांगलाच व्हायरल झाला होता. रानू मंडलच्या या व्हिडीओने तिला एका रात्रीत सुपरस्टार बनविले. तिच्या या आवाजाला आता ऑफिशियल ओळख मिळाली आहे. हिमेश रेशमियाच्या ‘हैप्पी हार्डी एंड हीर’ या चित्रपटात गाण्याची संधी दिली. यानंतर हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला मात्र आता या एका गाण्यासाठी मंडल यांना हिमेश दिलेल्या मानधनाचा आकडाही समोर आला आहे.
वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार,रानू मंडलला पहिल्यावहिल्या गाण्यासाठी हिमेशने जवळपास ६ ते ७ लाख रुपये मानधन दिले आहे. मात्र हिमेशने देऊ केलेले मानधन रानू स्वीकारात नव्हती. हिमेशने त्यांना अगदी आग्रहाने हे पैसे दिले. रानू यांना तुम्ही बॉलिवूडमध्ये नक्की यशस्वी होणार असंही हिमेशने सांगितलं. ‘तुम्हाला बॉलिवूडमध्ये स्टार होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही,’ अशा शब्दात प्रोत्साहन दिलं.