नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा पत्ता आता बदलला आहे. कारण अमित शहा यांचा माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निवासस्थानात अधिकृतपणे प्रवेश झाला आहे. अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर हा बंगला रिकामा होता.वाजपेयी यांच्या मानसकन्या नमिता भट्टाचार्य यांनी हा बंगला आणि माजी पंतप्रधानांच्या कुटूंबीयांना मिळणारी एसपीजी सुरक्षा व्यवस्था सराकारला परत देवू केली होती. त्यामुळे आता या बंगल्यात अमित शहा यांनी प्रवेश केला आहे.
दरम्यान, अमित शहा यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यापासूनच त्यांना हा बंगला मिळणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. त्याच चर्चांना आता पुर्णविराम मिळाला आहे. यापुर्वी अमित शहा यांचे 11 अकबर रोड असा पत्ता होता तो आता बदलून 6 ए कृष्णमेनन असा झाला आहे. अटल बिहारी वाजपेयी हे या बंगल्यात तब्बल 14 वर्ष वास्तव्यास होते. त्यांच्या आयुष्याचा शेवटचा काळ त्यांनी याच बंगल्यात घातला होता. त्यामुळे हा बंगला कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष होते. दरम्यान, अमित शहा यांना देण्यात आलेला हा बंगला त्यांचे सरकारमधील त्यांचे स्थान दाखवून देते.