मंचर-अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी शिवाजीनगर-पुणे येथील अधीक्षक डाकघर यांच्या कार्यालयासमोर एकदिवसीय उपोषण करण्यात आले, अशी माहिती डाक सेवक संघाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र राऊत, सचिव एकनाथ मंडलिक यांनी दिली.
यावेळी डाक सेवकांनी विविध मागण्यांचे निवेदन वरिष्ठांना दिले. ग्रामीण डाक सेवकांना सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात यावा. 12, 24 आणि 36 व्या वर्षी तीन पदोन्नती देण्यात याव्यात. ग्रुप विमा 5 लाख रुपये देण्यात यावा.
पगारी रजा 180 दिवसांपर्यत जमा करुन त्याचे रोखीकरण द्यावे. एक हाती शाखा डाकपालकांना कंबाईन ड्युटी भत्ता देण्यात यावा. इएसआय आणि सीजीएचएस डिसपेंसरी मार्फत वैद्यकीय सुविधा देण्यात याव्यात. कमिशन व मानधन व्यवस्था बंद करुन ती कामे शाखा डाक पालकांच्या कामाच्या वर्कलोड मध्ये समाविष्ट करण्यात यावी. निवृत्तीचे सर्व आर्थिक लाभ निवृत्तीच्या दिवशीच देण्यात यावेत.अतीरंजीत टार्गेटचे उद्दिष्ट देणे बंद करुन त्यासाठी अधिकाऱ्यांच्यावतीने होणारा ग्रामीण डाक सेवक कर्मचाऱ्यांचा मानसिक आणि आर्थिक छळ थांबविण्यात यावा. इत्यादी हे मागण्यांसाठी उपोषण करण्यात आले.
यावेळी डाक सेवक संघाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र राऊत, सचिव एकनाथ मंडलिक, वसंत तरेकर, अविनाश ढमाले, बबन गायकवाड, अशोक बांदल, युवराज काळंगे यांच्यासह डाक कर्मचारी उपोषणात सहभागी झाले होते.