पुणे – दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लष्कर परिसरातील फॅशन स्ट्रीट, कुंभारबावडी भाजी मार्केट या दोन्ही बाजारपेठेंतील व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. बोर्डाने या दोन्ही बाजारपेठा खुल्या करण्यास तात्पूर्ती परवानगी दिली असून, या ठिकाणी देखरेखीसाठी सिव्हील एरिया समितीदेखील स्थापन केली जाणार आहे.
लॉकडाऊन काळात बोर्डाने फॅशन स्ट्रीट आणि कुंभारबावडी भाजी मार्केटला टाळे लावले होते. ऑगस्ट व सप्टेंबरपासून बोर्डाने लॉकडाऊन निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल करत लष्कर परिसरातील विविध मार्केट व बाजारपेठा खुल्या करण्यास परवानगी दिली.
मात्र, फॅशन स्ट्रीट आणि कुंभारबावडी भाजी मार्केट बंदच ठेवले होते. त्यामुळे येथील व्यावसायिक आर्थिक अडचणीत आले होते.
बाजारपेठा सुरू करण्याची मागणी होत होती. त्याची दखल घेत बोर्डाच्या सर्वसाधारण सभेने महिनाभरासाठी या दोन्ही बाजारपेठा खुल्या करण्यास मंजुरी दिली.