पुणे – राज्यातील विद्यापीठे व महाविद्यालयातील प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) वारंवार सूचना दिल्या आहेत.
परंतु अजूनही ती भरली गेली नाहीत. मात्र प्राध्यापकांची पदे रिक्त असल्यास अशा महाविद्यालयांवर “यूजीसी’ला कडक कारवाईचे अधिकार असल्याचे “यूजीसी’चे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांनी
स्पष्ट केले.
“यूजीसी’ने महाराष्ट्रासह सर्व राज्यांनी प्राध्यापकांची रिक्त पदे 100 दिवसांत भरावीत, असे निर्देश दिले होते. त्यानंतरही राज्यातील तब्बल चार हजार पदे रिक्त आहेत.
याबाबत पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना डॉ. पटवर्धन यांनी प्राध्यापकांची पदे रिक्त ठेवल्यास यूजीसीला कारवाई करण्याचे अधिकार आहेत. मात्र, यूजीसीने त्याचा वापर केला नाही, असेही डॉ. पटवर्धन यांनी सांगितले.