बीटी बियाणांची पेरणी केल्याने शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल – राज्यातील पहिलीच कारवाई

अकोला – बंदी असलेल्या बीटी कापसाच्या बियाणांची पेरणी केल्याने अकोल्यातील 12 शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकारे कारवाई करण्याची ही राज्यातील पहिलीच घटना आहे.

अकोला जिल्ह्यातील आडगाव आणि अकोली जहांगिरी येथील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कापसाच्या बीटी बियाणंची पेरणी केली होती. या बीटी बियाणांवर केंद्र सरकारने बंदी घातलेली आहे. ही पेरणी जुन महिन्याच्या प्रारंभी करण्यात आली असल्याची माहिती समजते. या पेरणीवर स्थानिक शेतकरी संघटनेने आक्षेप घेतला होता. त्यानंतर कृषी विभागाने दिलेल्या तक्रारीनुसार अकोटी आणि हिवरखेडा येथे एफआयआर दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आडगाव आणि अकोली जहांगिरी येथील ललीत बहाले यांच्यासह 12 शेतक-यांवर भारतीय दंड संहिता अंतर्गत तक्रार नोंद करण्यात आली आहे, असे हिवरखेडाचे पोलीस निरीक्षक सोमनाथ पवार यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.