बाजारभावाच्या आशेवर उन्हातान्हात शेतीकामे

मंचर – आंबेगाव तालुक्‍यात गवार खुरपणीच्या आणि तोडणीच्या कामांना वेग आला आहे. गवारीला चांगला बाजारभाव मिळेल या भरवशावर ऐन उन्हातही शेतकरी खुरपणी, पाणी भरणे, औषध फवारणी आदी कामे करीत आहेत.

बहुतांशी भागात बारमाही पाण्याची उपलब्धता असल्यामुळे येथील शेतकरी बारमाही पिके घेतात. जून, जुलैमध्ये गवार पिकाला चांगला बाजारभाव मिळेल या आशेने पूर्व भागातील शेतकरी एप्रिल-मेमध्ये गवारीची लागवड करतात. मंचर, अवसरी, जारकरवाडी, लाखणगाव, देवगाव, काठापूर आदी गावांमध्ये गवारीचे पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सध्या उन्हाचा पारा 40 ते 42 अंश सेल्सिअस असतानाही डोक्‍यावर कापड घेऊन व तोंडाला रुमाल बांधून शेतकरी महिला गवार खुरपणीची आणि तोडणीची कामे करीत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.