बेल्हे – राजुरी गणेश सहकारी दूध संस्थेच्या वतीने दुधाला प्रतिलिटर खरेदीदर तीन रुपयांप्रमाणे वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती दूध संस्थेचे अध्यक्ष गोपाळा औटी व सचिव विशाल सहाणे यांनी दिली.
राजुरी (ता. जुन्नर) येथील गणेश सहकारी दूध व्यावसायिक संस्थेने उत्पादकांना प्रतिलिटर तीन रुपये अधिकचा भाव देण्याचे ठरवले आहे. यामध्ये 1 सप्टेंबरपासून दोन रुपये भाव प्रतिलिटर वाढवून दिला असून शुक्रवारी (दि. 11) पुन्हा 1 रुपया प्रतिलिटर भाव असा तीन रुपये एका लिटरमागे वाढवून दिला आहे. हा निर्णय मासिक सभेत घेण्यात आला.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष बाळासाहेब हाडवळे, सुभाष पा. औटी, विशाल हाडवळे, दुलबाजी औटी, तुकाराम डुंबरे, अशोक हाडवळे, बबन हाडवळे, ज्ञानेश्वर घंगाळे, लक्ष्मण औटी, निवृत्ती औटी, राजाराम औटी, लक्ष्मण घंगाळे, रईस चौगुले, गणेश शिंदे, सुनिता फावडे, पुष्पा हाडवळे, शिवाजी औटी आदी संचालक उपस्थित होते.