युतीचे सरकार आल्यापासून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या- राष्ट्रवादी काँग्रेस

मुख्यमंत्र्यांच्या विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच

मंबुई: युतीचे सरकार आल्यापासून २०१५ ते २०१९ या काळात विदर्भात तब्बल ५६८७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. विशेष म्हणजे हा सरकारी आकडा आहे. प्रत्यक्षात हा आकडा अधिक असण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक झाली नाही म्हणूनच शेतकरी आत्महत्या करण्याचा निर्णय घेत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे.

हे सरकार आल्यापासून दुष्काळ, शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या जणू महाराष्ट्राच्या पाचवीलाच पुजल्या गेल्या आहेत. म्हणूनच की काय अजूनही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबता थांबत नाहीत.

२०१४ साली मुख्यमंत्र्यांनी जे आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते मुख्यमंत्री त्या आश्वासनांची पूर्तता का करत नाहीत? शेतकऱ्यांच्या मुळावर का उठलंय सरकार ? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसने उपस्थित केला आहे.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here