जनाची नाही तर मनाची लाज तरी बाळगा!; जयंत पाटलांचा भाजपला टोला

मुंबई: भाजपा हा फक्त निवडणूक लढविणारा पक्ष असून यांना जनतेशी काही देणंघेणं नाही. दुष्काळी उपाय योजनेवर उच्च न्यायालयाने फडणवीस सरकारला विचारलेल्या जाबाने हे सिद्ध होते. सरकारच्या कार्यपद्धतीवर या आधीदेखील न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. तेव्हा आता किमान जनाची नाही तर मनाची लाज तरी बाळगा!, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपला लगावला आहे.

जयंत पाटील म्हणाले, मुख्यमंत्र्यांना दुष्काळ सोसत नसताना राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते दुष्काळी भागात जाऊन जनतेची मदत करत आहेत. भाजप मंत्र्याचा मात्र या भीषण परिस्थितीत देखील वाचाळवीरपणाच सुरु आहे. तोच वेळ विकास कामांसाठी वापरला तर पुन्हा उच्च न्यायालयासमोर मान खाली घालण्याची नामुष्की येणार नाही.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.