बॉलीवूडमधील सुपरस्टार अभिनेता सलमान खान याचे आगामी “भारत’ आणि “दबंग 3′ हे दोन चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहेत. यानंतर संजय लीला भंसाली यांच्या “इंशाअल्लाह’मध्ये तो पहिल्यांदाच आलिया भट्टसोबत काम करणार आहे.
याशिवाय सलमान खान आता फरहान अख्तरसोबतही चित्रपटाची निर्मिती करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. काही दिवसांपूर्वी एका चित्रपटाविषयी चर्चा करण्यासाठी फरहान हा सलमानच्या घरी गेला होता. मात्र, फरहान हा प्रड्यूस किवा डायरेक्ट करणार, हे अद्याप निश्चित झालेले नाही. पण दोघेही एकत्रित काम करण्यासाठी उत्साहित आहे.
दरम्यान, फरहान हा “डॉन 3’चे काम सुरू करण्याची शक्यता धुसुर झाली आहे. तसेच या चित्रपटासाठी शाहरुख खानकडून होकार येणे बाकी आहे आणि फरहानही काम सुरू करण्याच्या मूडमध्ये नाही. त्यामुळे फरहान हा नवीन प्रॉजेक्टच्या तयारीत आहे. हा चित्रपट जर तयार झाल्यास दर्शकांना सलीम-जावेद यांची पुढील पीढी एकत्रित पाहण्यास मिळणार आहे. या दोन्ही अभिनेत्यांच्या वडिलांनी बॉलीवूडमध्ये एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.