दोस्तांपेक्षा शत्रूंवरच अधिक भरवसा

“भारत’च्या प्रमोशनमध्ये बिझी असलेल्या कतरिना कैफने अलिकडेच आपला एक्‍स बॉयफ्रेंड रणबीर कपूरबरोबरच्या रिलेशनशीपबाबत कॉमेंट केली आहे. आलिबाबरोबर डेटिंग करण्यापूर्वी रणबीर कपूर आणि कतरिना लीव्ह इन रिलेशनशीपमध्ये रहात होते. पण 2016 मध्ये दोघांचा ब्रेक अप झाला होता. या सगळ्याला आता तीन वर्षे होऊन गेली आहेत. पण अजूनही कॅटच्या आठवणीतून तो पॅच जात नाही आहे.

“मी जे काही काम करते, त्याचा वास्तविक आयुष्याशी काही तरी संबंध जोडलेला असतो. सिनेमातल्या कॅरेक्‍टशी स्वतःला कनेक्‍ट करण्याचा मी नेहमीच प्रयत्न करत असते. स्वतःला घडवण्यापूर्वी मला स्वतःला स्वतःपासूनच तोडावे लागले. मला जे काही सोसायचे होते. त्याला अधिक चांगल्याप्रकारे स्वीकारण्यासाठी मला नेहमीच थोडी तयारी करावी लागली. मात्र ज्या गोष्टीला मी जबाबदार नाही, त्याचा माझ्यासाठी काही प्रश्‍नच नाही.’ असे कॅट म्हणाली.

रणबीर किंवा कोणाच्याही नावाचा उल्लेख तिने केला नाही. कोणत्याही जुन्या गोष्टींवरून मनात कटुता नाही. पण काही चांगले करण्याच्या बाबतीत नुकसानच करून घेतल्याचे तिने सांगितले. आपल्याला आता दोस्तांपेक्षा शत्रूंवरच अधिक भरवसा वाटायला लागल्याचे ती ओघानेच म्हणाली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.