नगर – नगर शहराचा 530 स्थापना दिनाचे औचित्य साधत स्नेहबंध सोशल फाऊंडेशनने ऐतिहासिक फराह बक्ष महालाचे छायाचित्र आमदार अरुणकाका जगताप यांना भेट देण्यात आला. यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष अमित खामकर उपस्थित होते.
शहराला 530 वर्षांचा गौरवशाली वारसा लाभला आहे. महाराष्ट्रातील अन्य कुठल्याही शहरात नाहीत इतक्या वास्तू नगर आणि परिसरात आजही उभ्या आहेत. भुईकोट किल्ला, बागरोजा, चांदबीबी महाल (सलाबतखान मकबरा), दमडी मशीद, आनंदधाम, मेहेराबाद, दत्त मंदिर, विशाल गणपती, रणगाडा संग्रहालय, स्नेहालय, डोंगरगण, ऐतिहासिक वस्तु संग्रहालय अशा अनेक गोष्टी येथे आहेत. तथापि, यातील अनेकांचे महत्त्व नगरकरांनाच माहिती नसल्यामुळे पर्यटनवाढीसाठी त्यांचा फारसा उपयोग करून घेतला जात नाही.
हा वारसा नगरकरांना माहिती व्हावा, या उद्देशाने स्नेहबंध सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी नगर शहरातील ऐतिहासिक छायाचित्रे शहरातील विविध कार्यालये व अधिकाऱ्यांना देण्याचा संकल्प केला. ऐतिहासिक वास्तूंमुळे कल्पकता, बांधकाम तंत्रज्ञान, संस्कृतीचे दर्शन 28 मे 1490 रोजी अहमदशहा बादशाहाने शहर स्थापनेला सुरुवात केली. या काळात उभारण्यात आलेल्या विविध वास्तू इतिहासाच्या साक्षीदार म्हणून उभ्या आहेत. त्या काळातील कल्पकता, बांधकाम तंत्रज्ञान, संस्कृती यांचे दर्शन या वास्तूंमुळे होते, अशी प्रतिक्रिया स्नेहबंधचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.