मुंबई – ‘पुष्पा: द राइज’च्या ब्लॉकबस्टर यशानंतर आता चाहते अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ची (Pushpa 2) आतुरतेने वाट पाहत आहेत. जेव्हापासून या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची घोषणा झाली आहे. तेव्हापासून चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. काही महिन्यांपूर्वी बातमी आली होती की हा चित्रपट 2024 मध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. मात्र आता अल्लू अर्जुनच्या (Allu arjun) ‘पुष्पा 2’ या चित्रपटाचे शूटिंग काही काळासाठी पुढे ढकलण्यात आल्याचे समजते.
‘पुष्पा 2’चे शूटिंग थांबवण्यात आले आहे. अल्लू अर्जुन चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जखमी झाला. अल्लू अर्जुन एक ऍक्शन सीन शूट करत असताना हा अपघात झाला असल्याचे समजते. ऍक्शन शूट करताना अल्लू अर्जुनला पाठीला दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे चित्रपटाचे शूटिंग काही काळ थांबवावे लागले. (allu arjun accident)
गेल्या काही दिवसांपासून पुष्पा २ ची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. या चित्रपटातील अल्लूचा आगळावेगळा लूक प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपट ब्लॉकबस्टर होणार हे निश्चित आहे. अशात अंतिम टप्प्यातील काही शूट बाकी असताना अल्लूचा अपघात झाल्याने फॅन्स देखील चिंतेत आहेत. सध्या दुखापतीमुळे डॉक्टरांनी अभिनेत्याला काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.’पुष्पा 2’चे अंतिम टप्प्यातील शूटिंग डिसेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यापासून पुन्हा सुरू होऊ शकते.
ऑगस्ट 2024 मध्ये होणार प्रदर्शित
‘पुष्पा 2’ बद्दल बोलायचे झाले तर अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदान्ना, फहद फासिल, जगपती बाबू यांच्यासह अनेक स्टार्स लीड रोलमध्ये दिसणार आहेत. रिलीजच्या तारखेबद्दल, निर्मात्यांनी सांगितले होते की ते 15 ऑगस्ट 2024 रोजी चित्रपट प्रदर्शित करू शकतात. मात्र, सध्या चित्रपटाचे शूटिंग पुढे ढकलण्यात आले आहे, त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल होण्याची शक्यता आहे.