‘Pushpa 2’ Poster| दक्षिणात्य अभिनेता अल्लु अर्जुनचा ‘पुष्पा : द राइज’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. यात अल्लु अर्जुनसोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्यभूमिकेत पाहायला मिळाली होती. ‘पुष्पा’ सिनेमात श्रीवल्लीची भूमिका साकारून अभिनेत्री रश्मिका मंदाना प्रसिद्धी झोतात आली. यानंतर आता ‘पुष्पा २’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. याचे शूटिंग सध्या जोरदारपणे सुरू आहे.
नुकतेच या चित्रपटातील आणखी एक पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. यापूर्वी या चित्रपटाचे दोन पोस्टर रिलीज झाले आहेत. यानंतर नव्या पोस्टरद्वारे श्रीवल्लीचा पहिला लूक दाखवण्यात आला आहे.
Pushpa Raj begum @iamRashmika from #Pushpa2TheRule 🔥🔥
Birthday wishes to ever charming Srivalli from Pushpa Raj @alluarjun
Fans 😍#Pushpa2TheRuleTeaser pic.twitter.com/Dm97qXovP1— Allu Arjun Devotees 🐉 (@SSAADevotees) April 5, 2024
आज रश्मिकाच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना गोड सरप्राइज देण्यात आले आहे. शेअर केलेल्या पोस्टरमध्ये रश्मिकाने हिरव्या रंगाची साडी नेसल्याचे पाहायला मिळत आहे. हातात बांगड्या आणि गळ्यात दागिने घालत तिने पारंपरिक साज केला आहे. तिच्या गळ्यात मंगळसूत्र आणि केसांत सिंदूरही दिसत आहे. ‘पुष्पा २’मधील श्रीवल्लीचा हा लुक चाहत्यांच्याही पसंतीस पडत आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी ‘पुष्पा 2’ मधील अल्लू अर्जुनचा लूकही चाहत्यांसमोर आला होता. निर्माते अल्लू अर्जुनच्या वाढदिवशीनिमित्त 8 एप्रिल रोजी या चित्रपटाचा टीझर रिलीज करणार आहे. तर ‘पुष्पा 2: द रूल’ हा चित्रपट याचवर्षी 15 ऑगस्टला रिलीज होणार आहे. सुकुमार यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. ‘पुष्पा: द राइज’ या 2021 मध्ये आलेल्या सिनेमाने धुमाकूळ घातला होता. आता तीन वर्षांनी दुसरा भाग ‘पुष्पा : द रुल’ही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
हेही वाचा:
‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षितने पतीसोबत गायलं गाणं; व्हिडिओ व्हायरल