मुंबई – बॉलीवूडच्या प्रसिद्ध स्टार किड्सपैकी एक असलेल्या अभिनेत्री ‘अलाया फर्निचरवाला’ सध्या आपल्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. प्रसिद्ध अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी अलाया फर्निचरवालाने अभिनेता सैफ अली खान आणि तब्बू स्टारर ‘जवानी जानेमन’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.
या चित्रपटातील अलायाच्या अभिनयाची सर्वानीच खूप प्रशंसा केली. त्यानंतर अलाया बरेच दिवस चित्रपटांमध्ये दिसली नाही परंतु ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते त्यामुळे तिच्या नावाची सिनेसृष्टीत नेहमी चर्चा होते. आकर्षक फोटो आणि स्टायलिश पोशाखांव्यतिरिक्त चाहत्यांना अलायाची मोहक स्माईल प्रचंड आवडते.
दरम्यान, सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अलाया फर्निचरवालाने नुकतचं तिच्या इंस्टाग्रामवर स्वतःचे काही बोल्ड फोटो शेअर केले असून, सध्या अभिनेत्रीचे हे फोटो तुफान व्हायरल होत आहे. अलाया फर्निचरवालाचे बिकिनीतील फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये अलाया बोल्ड आणि ब्युटिफूल दिसत आहे. फॅन्सला देखील अभिनेत्रीचा हा कातिलाना अंदाज प्रचंड आवडला असून, चाहते या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षात करत आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अलाया फर्निचरवालाचे इंस्टाग्रामवर लाखोंच्या घरात फॉलोवर्स आहेत.