बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही त्या स्टार्स किडस् पैकी आहे, जिने पहिल्या चित्रपटातून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. जान्हवीने खूप कमी काळावधीत इंडस्ट्रीत आपले स्थान मजबुत केले आहे.
जान्हवी सोशल मीडियावर देखील खूप ऍक्टिव्ह असते. ती सतत आपले लेटेस्ट फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांशी शेअर करत असते. तिने नुकताच ब्राइडल लुकमधील एक फोटो शेअर केला आहे, जो सध्या खूप व्हायरल आहे. या फोटोत जान्हवी खूपच सुंदर दिसत आहे.
बॉलीवूडमधील प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रासाठी जान्हवीने ब्राइडल लुक कॅरी केला होता. मनीषने नुकतेच आपल्या नवीन ब्राइडल कलेक्शन लॉन्च केले आहे. ज्यात जान्हवीने सहभाग घेतला होता. या फोटोत जान्हवीच्या दोन्ही हातांवर मेहंदी दिसत आहे.
तसेच हेवी ज्वेलरीसह डोक्यावर घेतलेल्या घूंघटमध्ये जान्हवीचा अंदाज खूप दिलखेचक असा आहे. हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत तिने लिहिले की, “तुम्हाला शहनाईचा आवाज ऐकू येते की फक्त मलाच. मनीष मल्होत्राच्या नवीन कलेक्शनमध्ये सहभागी झाल्याने मी खूप आनंदी आहे.
या क्षणांचा मी मनापासून आनंद घेतला.’ ब्राइडल लुकमधील जान्हवी कपूरच्या या लुकवर चाहते क्रेझी झाले आहेत. या फोटोंना आतापर्यत 3 लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहे. तसेच अनेकांनी कमेंटस्ही करत जान्हवीचे कौतुक करत आहेत.
View this post on Instagram