मुंबई – अभिनेत्री अमिषा पटेल सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. कधी ती आपल्या फॅनसोबत व्हिडीओ कॉलवर बोलताना व्हायरल होते तर कधी आपल्या बोल्ड ड्रेसमुळे चर्चेत येते. आता देखील आमिषाचा एक असाच व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यामुळे ती चर्चेत आली आहे. या व्हिडिओमध्ये आमिषा बीचवर आपल्या मित्रांसह वॉलीबॉल खेळताना दिसत आहे.
पिंक टॉप आणि पिंक कॅपमध्ये आमिषाचा बोल्ड लूक चाहत्यांना चांगलाच पसंत पडत आहे. आय लव्ह स्पोर्ट्स असं म्हणत आमिषाने हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यासोबतच मुंबईला परत आल्याचे देखील आमिषाने या पोस्टमध्ये म्हंटले आहे. यावेळी आमिषाने आपल्या बीचवरील चाहत्यांना सेल्फी देखील दिल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येते.
View this post on Instagram
आमिषा लवकरच सनी देओलसोबत गदर २ मध्ये दिसणार आहे. सकीनाच्या भूमिकेत तिला पाहण्यासाठी चाहते देखील उत्सुक आहेत. गदर हा चित्रपट भारत पाकिस्तानमधील दंगल आणि नात्यांवर भाष्य करणारा सुपरहिट सिनेमा होता. त्याचा पुढील भाग नेमका कोणत्या विषयावर असणार याची उत्कंठा प्रेक्षकांना लागली आहे. २०२३ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.