मुंबई – प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री व कास्टिंग दिग्दर्शक आरती मित्तलला सेक्स रॅकेट प्रकरणी सोमवारी अटक करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक मनोज सुतार यांना मित्तल हा वेश्या व्यवसाय चालवत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून आरतीला रंगेहात पकडले. मुंबई क्राइम ब्रांच युनिट 11ने ही कारवाई केली आहे.
पोलिसांनी बनावट ग्राहकांना गोरेगाव येथील हॉटेलवर पाठवत हे प्रकरण उघडकीस आणलं. त्यांनी आरती मित्तलकडे दोन मुलींची मागणी केली. यासाठी 60 हजार रुपये आरतीने मागितले होते. त्यानंतर आरती मित्तलला दोन मुलींना घेऊन हॉटेलवर बोलवले होते. यात सामील होण्यासाठी आरतीने अधिक पैशांची मागणीही केली होती. त्यानंतर आरती हॉटेलवर येताच पोलिसांनी तिला अटक केली.
या कारवाईत सोशल सर्व्हिस ब्रांचने 2 मॉडेल्सची सुटका करून त्यांचे पुनर्वसन केले. सोशल सर्व्हिस ब्रांचने या प्रकरणाची चौकशी करून पुरावा म्हणून घटनेचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही केले. याबाबत दिंडोशी पोलिसांना माहिती देण्यात आली आणि एफआयआर नोंदवून आरोपी मित्तलला अटक करण्यात आली.
View this post on Instagram
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मॉडेल्सना मित्तल प्रत्येकी 15,000 रुपये देणार होती. आरती वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी मॉडेल्सची भेट घेत आणि त्यांना पैसे देऊन फसवत असे. दरम्यान, आरती मित्तलने अभिनेत्री आणि कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम केले आहे. ‘अपनापन’ या मालिकेत ती दिसली होती.