entertainment news – प्रसिद्ध अभिनेते जावेद जाफरीला कोण ओळखत नाही. जावेदचे अनेक चित्रपट आजही प्रेक्षकांना आवडतात. त्याचा ‘धमाल’ चित्रपट कोण विसरू शकेल. इतकंच नाही तर अनेक चित्रपटांमध्ये साईड रोल अॅक्टरची भूमिका साकारून जावेदने खूप नाव कमावलं आहे. सध्या त्यांच्या लेकीची चर्चा सर्वत्र होत आहे.
View this post on Instagram
जावेद जाफरीचा मुलगा मीझान जाफरी हा आधीपासूनच सिनेमाचा एक भाग आहे आणि तो अनेक चित्रपटांमध्ये दिसला आहे. मीजानने 2019 मध्ये ‘मलाल’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर तो शिल्पा शेट्टीसोबत ‘हंगामा 2’ या चित्रपटातही दिसला आहे. इतकेच नाही तर त्याचा ‘यारियाँ 2’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. जावेद जाफ़रीच्या मुला प्रमाणेच मुलगीही सतत चर्चेत असते.
जावेदच्या लेकीचे नाव अलविया जाफरी आहे. अलाविया खूप सुंदर आणि प्रसिद्ध स्टार किड आहे. अलविया जाफरी ने तिच्या किलर फोटोंनी संपूर्ण इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. नुकतेच अलविया जाफरी तिच्या व्हिडिओ आणि फोटोंनी सगळ्यांना घायाळ केले. मात्र आता सोशलवर अशी चर्चा रंगली आहे कीसुंदर दिसण्यासाठी अलावियाने सर्जरी केली आहे.
याबाबत अलविया जाफरी नेही आपल्या ओठावर शस्त्रक्रिया झाल्याचा खुलासा केला होता. जेणेकरून ती आणखी सुंदर दिसू शकेल. अलविया जाफरी ने उघड केले की तिने कॉलेजमध्ये असताना जून 2019 मध्ये तिचे ओठ फिलरने भरले होते कारण तिला तिचे ओठ थोडे मोठे करायचे होते. इतकेच नाही तर तिने पुढे सांगितले की डिसेंबर 2019 मध्ये तिने डोळ्यांखाली फिलर्स लावले होते कारण तिची काळी वर्तुळे खूप ठळक होती. तिच्या डोळ्याखाली फिलर्स आले.
अलवियाने अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेले नाही, परंतु सोशल मीडियावर तिची फॅन फॉलोईंग खूप आहे. इंस्टाग्रामवर तिचे अडीच लाख फॉलोअर्स असून ही संख्या सातत्याने वाढत आहे. चाहते अलाव्हियाच्या फोटोंची आतुरतेने वाट पाहत असतात.