मुंबई – सध्या फेसबुक, व्हॉट्स अॅप, ट्विटर आणि इतर सोशल मीडियावर फेक न्यूजचा सुळसुळाट वाढत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात फेक न्यूज पसरवल्या जातात . या प्रकरणी तपास सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे.
Maharashtra: Case registered against an unknown person for creating a fake Twitter account in the name of actor Raveena Tandon and posting tweets defaming Mumbai Police
— ANI (@ANI) November 1, 2020
यापूर्वीदेखील अनेक सेलिब्रिटींच्या नावाने फेक अकाऊंट तयार करण्यात आल्याचं समोर आलं. आहे. यात अलिकडेच अभिनेता सोनू सूदच्या नावाने फेसबुक, ट्विटरवर फेक अकाऊंट तयार करुन नागरिकांकडून पैसे उकळ्याचा प्रकार समोर आला होता. तर आता अभिनेत्री रविना टंडन हिच्या नावाने ट्विटरवर फेक अकाऊंट सुरु असल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी अज्ञाताविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. रविनाच्या नावाने सुरु असलेल्या या फेक अकाऊंटवरुन मुंबई पोलिसांना बदनामी करण्यात येत असल्याचं दिसून येत आहे.