मुंबई – पंजाबमध्ये पाकिस्तानच्या सीमेलगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाहनाचा ताफा २० मिनिटे खोळंबून राहतो, पण तेथील काँग्रेसचे मुख्यमंत्री साधी दखलसुद्धा घेत नाहीत. आता महाराष्ट्राचे काँग्रेस अध्यक्ष मी मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो.. असं विधान करतात. काँग्रेस पक्षाचे चालले तरी काय? कधी काळी स्वातंत्र्याच्या आंदोलनात असणारा हा पक्ष इतक्या रसातळाला गेला.
काँग्रेसला आता लोकशाहीतील राजकीय पक्ष म्हणायचे की दहशत पसरवणारी संघटना आहे असं म्हणत भाजपा नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत पटोलेंच्या विधानाचा समाचार घेतला.
ते माध्यमांशी बोलतांना म्हणाले, “नाना पटोले बडबडे आहेत. नाना पटोलेंचं काय अस्तित्व आहे, ते बडबडे व्यक्ती आहेत. त्यांना केवळ शारीरिक उंची आहे, बौद्धिक उंची नाही. बौद्धिक उंची असती तर त्यांच्या बोलण्याला उत्तर दिलं असतं. केवळ शारीरिक उंची असणाऱ्या व्यकीला थोडीच उत्तर दिलं जातं
देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट
पाकिस्तानच्या सीमेनजीक पंजाबमध्ये मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी @narendramodi यांचा ताफा 20 मिनिटे खोळंबून राहतो, तेथील काँग्रेसचे मुख्यमंत्री त्याची साधी दखल सुद्धा घेत नाहीत.
आता महाराष्ट्राचे काँग्रेस अध्यक्ष म्हणतात, मी मोदींना मारु शकतो, शिव्या देऊ शकतो… https://t.co/JdzCZkrpHi— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 17, 2022