Facebook Small Business Loan | फेसबुक तरुणांना देणार 50 लाखांपर्यंतचं व्यवसाय कर्ज; जाणून घ्या

Facebook Small Business Loan – फेसबुकने भारतातील 200 शहरांमध्ये लघु व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या तरुणांना कर्ज देण्याची घोषणा केली आहे.  फेसबुकने म्हटले आहे की, तरुणांना आता लहान व्यवसाय सुरू करण्यासाठी 5 ते 50 लाख रुपयांचे कर्ज घेता येईल.  कंपनीने यासाठी इंडिफीसोबत भागीदारी केली आहे.  

यामध्ये, फेसबुकद्वारे पैसे दिले जातील, तर पैसे कोणाला द्यायचे आणि ते कसे वसूल करायचे, याचा अंतिम निर्णय इंडिफाय घेईल. फेसबुक इंडियाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजित मोहन यांनी सोशल मीडिया कंपनीच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ करताना सांगितले की या कर्जासाठी कोणत्याही प्रकारची मालमत्ता गहाण ठेवावी लागणार नाही.  

17 ते 20 टक्के व्याज दराने कर्ज दिले जाईल आणि महिलांनी चालवलेल्या व्यवसायाला व्याजदरात 0.2 टक्के सूट दिली जाईल.  अजित मोहन म्हणाले की शक्यतो फेसबुकचे इतर लोकही असे काम करतील आणि जास्तीत जास्त भांडवल बाजारात उपलब्ध होईल. अजित मोहन म्हणाले की, सध्या लघु आणि मध्यम उद्योग चालवण्यासाठी भांडवलाची गरज आहे, जे उपलब्ध नाही.  Facebook Small Business Loan

या समस्येवर मात करण्यासाठी फेसबुकने हा पुढाकार घेतला आहे.  फेसबुकने या योजनेसाठी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये 100 दशलक्ष डॉलर इतका निधी उभा केला होता, जो भारतासह इतर 30 देशांमध्ये वापरला जाईल. कंपनीच्या या उपक्रमांतर्गत दिल्ली, गुरुग्राम, मुंबई, हैदराबाद आणि बंगळुरू या पाच भारतीय शहरांमधील 3,000 उद्योजकांना आतापर्यंत 4 दशलक्ष डॉलर्स (भारतीय चलनात 29 कोटी 76 लाख 42 हजार रुपये) ची कर्जे देण्यात आली आहेत.

सध्या, जगभरातील 20 कोटींहून अधिक व्यावसायिक त्यांच्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्राम वापरतात.  यापैकी केवळ भारतातील 1.5 कोटींपेक्षा अधिक व्यावसायिक वापरकर्ते कंपनीच्या विविध उत्पादनांद्वारे त्यांच्या व्यवसायाचा प्रचार करत आहेत

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.