नवी दिल्ली – पत्नी आणि पत्नीचं नात हे विश्वासावर आणि प्रेमावर अवलंबून असतं. मात्र अनेकदा विश्वास कमी झाला किंवा प्रेम कमी झालं की, पती किंवा पत्नी चुकीच्या मार्गाने जातात. त्यातून मग विवाहबाह्य संबंध समोर येतात. यामुळे दोघांचंही आयुष्य खराब होण्याचा मोठा धोका असतो. अशीच एक घटना समोर आली आहे. मात्र या प्रकरणात पत्नीने शेजाऱ्यासोबत सुरू असलेल्या अफेअरसाठी पतीलाच जबाबदार धरलं.
लग्नानंतर एका महिलेला शेजारी राहणारा पुरुष आवडू लागला. पतीला अंधारात ठेवून पत्नीचं शेजाऱ्यासोबत अफेअर सुरू झालं. मात्र एकदिवस पतीला रात्री विचित्र आवाज येऊ लागले. त्यामुळे त्याला सुरुवातीला वाटलं चोर आले असतील. त्यामुळे त्याने सीसीटीव्ही फुटेज तपासलं.
यावेळी पतीला आपली पत्नी आणि शेजारी राहणारा मित्र हे एकमेकांना किस करताना दिसून आले. विशेष म्हणजे मित्र देखील विवाहित आहे. आपली पत्नी असं वागेल, या धक्क्याने पती हादरून गेला होता.
संतप्त पतीने पत्नीला घडलेल्या प्रकारावर जाब विचारला. त्यावर पत्नीने अफेअरसाठी पतीलाच जबाबदार धरलं. लग्नानंतर पती पूर्ण बदलला. तो आता आधीसारख प्रेमही करत नाही. पूर्वी काळजी घ्यायचा. आता लक्षही देत नाही. त्यामुळे मी शेजारी राहणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडल्याचं पत्नीने म्हटलं.