पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ने अंडर ग्रॅज्युएट कोर्सेससाठी कॉमन युनिव्हर्सिटी प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. उमेदवार व पालक यांच्या मागणीनुसार ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ज्या उमेदवारांनी अर्ज केला नाही, त्यांना अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करता येईल.
परीक्षा पद्धती आणि अभ्यासक्रम समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी सूचना नीट वाचणे आवश्यक आहे. सीयुइटी युजी २०२४ ची नोंदणीसह अर्ज ३१ मार्च रोजी रात्री ९.५० वाजेपर्यंत भरता येणार आहे. क्रेडिट/डेबिट कार्ड/नेट बँकिंग/युपीआयद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची सोय आहे असून, १ ते ३ एप्रिलदरम्यान एक दुरुस्ती विंडो प्रदान केली जाईल.
एनटीएच्या अधिकृत अधिसूचनेनुसार, विद्यार्थी मुदतीत तपशील दुरुस्त करू शकतात. त्यानंतर प्रवेशपत्रे मे २०२४ च्या दुसऱ्या आठवड्यात जारी केली जातील. परीक्षा १५ मे पासून ३१ मे पर्यंत असेल. उत्तर सूची प्रदर्शित करण्याची तारीख नंतर कळवली जाईल. तात्पुरते निकाल ३० जून रोजी वेबसाइटवर जाहीर होणार आहेत.