मुंबई – जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मिळालेल्या आश्वासनानंतर संपकाऱ्यांनी संप मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. या संपादरम्यान ठिकठिकाणी अनेकांनी सरकरविरोधात आपला रोष व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले. याचे अनेक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. यातीलच एका व्हिडिओचा विरोधात भाजप नेत्या चित्रा वाघ चांगल्याच संतप्त झाल्या आहेत.
संपादरम्यान एका महिलेने आपल्या भावना व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केले. याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर हा पंतप्रधान आणि उपमुख्यमंत्र्यांचा अपमान नाही का ? असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.
चित्रा वाघ यांनी या व्हिडिओबाबत एक ट्विट केले आहे ज्यामध्ये त्या म्हणतात,”सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सहानुभूती ठेवली तरी या संपाच्या आडून आपला अजेंडा चालविणारे महाभाग आहेत तरी कोण? संपातील एक महिला कर्मचारी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर व देवेंद्र फडणवीसजी यांच्या कुटुंबावर अत्यंत खालच्या पातळीवर बोलली तिच्यावर तात्काळ कारवाई झालीच पाहिजे..! मोर्चा…आपल्या प्रश्नांवर सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी संविधानाने दिलेलं हत्यार आहे पण त्यात हे असं वक्तव्य एखादी “सटवी”च करू शकेल” अशा शब्दात वाघ यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
चित्र वाघ पुढे म्हणतात,”फेसबुकवर दुसऱ्याची पोस्ट शेअर केली म्हणून मागच्या सरकारने एका मुलीला थेट तुरूंगात पाठवल…इथे तर थेट हातात माईक घेऊन अपशब्द बोलले गेले हा देशाचे पंतप्रधान व राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा अपमान नाही का ? पोलिसांनी स्युमोटो अंतर्गत कारवाई करावी. सरकारी यंत्रणेतील हे राजकीय पाताळषडयंत्री एकतर संघटनेने शोधून बाजूला सारावे नाहीतर राज्याच्या मुख्य सचिवांनी तरी त्यांना घरी बसवावे आम्ही शोध घेतला तर सापडायला फार वेळ लागणार नाही त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे.देवेंद्र फडणवीस कदाचित मनाचा मोठेपणा दाखवतील पण आम्ही क्षमा करणार नाही आणि खपवून तर मुळीच घेणार नाही..” अशा संतप्त भावना चित्रा वाघ यांनी व्यक्त केल्या आहेत.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सहानुभूती ठेवली तरी या संपाच्या आडून आपला अजेंडा चालविणारे महाभाग आहेत तरी कोण..??
संपातील १ महिला कर्मचारी मा.पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर व देवेंद्र फडणवीसजी यांच्या कुटुंबावर अत्यंत खालच्या पातळीवर बोलली तिच्यावर तात्काळ कारवाई झालीच… https://t.co/QGvHQN7Z7w
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) March 21, 2023