सुट्टीचे दिवस वगळता एक्‍स्प्रेस-वेवर मेगाब्लॉक

धोकादायक दरडी हटविण्याचे काम सुरू

पुणे – गेल्या काही वर्षांत पुणे-मुंबई एक्‍स्प्रेस-वेवर दरडी कोसळण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. त्याची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या दरडी काढण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे या महामार्गावर येत्या 5 मेपर्यंत मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.

त्यानुसार दररोज सहा वेळा या महामार्गावर टप्प्याटप्प्याने प्रत्येकी पंधरा मिनिटांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मात्र, प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन शनिवार आणि रविवार तसेच सार्वजनिक सुट्टयांच्या दिवशी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार नाही.

पुणे-मुंबई एक्‍स्प्रेस-वेवरील अमृतांजन पूल, आडोशी, खंडाळा आणि भातन बोगदा या परिसरात दरडी कोसळण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे त्यामुळे त्या हटविल्या जाणार आहेत.

असा घेणार मेगाब्लॉक
ब्लॉक 1 – सकाळी 10 ते 10.15
ब्लॉक 2 – सकाळी 11 ते 11.15
ब्लॉक 3- दुपारी 12 ते 12.15
ब्लॉक 4- दुपारी 2 ते 2.15
ब्लॉक 5- दुपारी 3 ते 3.15
ब्लॉक 6 – सायंकाळी 4 ते 4.15

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.