पीएमपी पासची बनवेगिरी उघड; विद्यार्थी ताब्यात

पुणे  – पीएमपीचे बनावट पास तयार करून ते अल्पवयीन विद्यार्थी स्वस्तात विकत असल्याचे निष्पन्न झाले आहे. दक्ष वाहकामुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. अमित सैताने (वय 35) या वाहकानेच फिर्याद दिली आहे.

दि. 11 जुलै रोजी सैताने हे स्वारगेट ते पुणे स्टेशन मार्गावर कर्तव्यावर होते. त्यावेळी एका विद्यार्थ्याने पुणे स्टेशन ते पॉवरहाऊस प्रवासात पास दाखविला. त्यांना तो पास संशयास्पद वाटला. त्यांनी विद्यार्थाकडे सखोल चौकशी केली असता, तो बनावट असल्याचे निष्पन्न झाले. हा 750 रुपये किंमतीचा पास वडगावशेरीतील 17 वर्षीय मुलाने 650 रुपयांना तयार करून दिल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार मुख्य वाहतूक निरीक्षक कुसाळकर, तिकीट तपासणीस आणि पास विभागातील सेवक आनंदा पेटकर आणि पोलिसांच्या पथकाने विद्यार्थ्याला बनावट पास बनवून देताना पकडले आहे. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असण्याची शक्‍यता आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)