“फ्रेन्डशिप डे’निमित्त “उत्साहाचा पाऊस’

विविध गिफ्ट्‌स, बॅन्ड्‌सचा बाजारपेठेत “ट्रेन्ड’ : ऑनलाइनकडेही कल
 
पुणे – मैत्री साजरी होणाऱ्या “विशेष’ दिवसानिमित्त अर्थात “फ्रेन्डशिप डे’ निमित्त बाजारपेठांमध्ये विविध “खास’ गोष्टींचा “ट्रेन्ड’ आहे. आपल्या दोस्तांच्या आवडीचा विचार करत ऑनलाइन आणि ऑफलाइन खरेदीकडे पावले वळविली आहेत. दरम्यान, गेल्या आठवडाभरापासून पाऊस सुरू असला, तरी खरेदीचा उत्साह तसुभरही कमी झालेला नाही.

“फ्रेन्डशिप डे’ला आपल्या मित्रमैत्रिणींना खास भेटवस्तू देऊन हा दिवस अविस्मरणीय करण्याकडे तरुणाईचा कल असतो. यंदाच्या “फ्रेन्डशिप डे’च्या निमित्ताने गिफ्टबाबतचा दै. “प्रभात’च्या प्रतिनिधीने जाणून घेतलेला कल. आपल्या मित्र मैत्रिणीच्या हातावर मैत्रीचे प्रतिक म्हणून बांधल्या जाणाऱ्या “फ्रेन्डशिप बॅन्ड’मध्ये “सॉ बीड बॅन्ड’, “ग्लो बॅन्ड’, “प्लॅटिनम बॅन्ड’ अशा “बॅन्ड्‌स’चा सध्या “ट्रेन्ड’ आहे. यासह कस्टमाईज रिंग, कडं यांचीसुद्धा “डीमांड’ आहे.

यासह “पेअर’ अर्थात दोन सारखे दिसणारे कॉफी मग, टी शर्ट, कुशन्स, नेकपीस, लॉकेटस, की-चेन्स, घड्याळ आदी गोष्टी चांगला पर्याय आहे, असे चित्र आहे. मैत्रीचे प्रतीक म्हणून मित्र किंवा मैत्रिणीला भेट देता येईल, असे मत तरुणाईने व्यक्त केले. यासह मित्र-मैत्रिणी किंवा ग्रुपफोटोचे कोलाज, ग्रीटिंग कार्ड, स्क्रॅप बुक, स्लॅम बुक या गोष्टी भेट म्हणून देता येऊ शकते. आठवण म्हणून ही भेट फार छान सांभाळून ठेवता येते. त्याचबरोबर वेळ ही सगळ्यांत भारी आणि मस्त भेट आहे. “फ्रेन्डशिप डे’च्या निमित्ताने मित्र-मैत्रिणीबरोबर पार्टी, ट्रीपला जाता येईल, हे सुद्धा “मस्त’ गिफ्ट ठरेल, अशी भावना अनेक तरुणांनी व्यक्त केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.