“पाणी साचणाऱ्या’ ठिकाणांची यादीच “खड्ड्यात’!

सतत पाणी साचणारी ठिकाणे
पुणे –
वाहतूक कोंडीला नागरिक, कधी वाहतूक विभाग तर कधी महापालिकेला आपण जबाबदार धरतो. वाहन चालविताना नियमांचे पालन जितके आवश्‍यक आहे, त्याचप्रमाणे पायाभूत सुविधा पुरविणेदेखील महत्त्वाचे आहे. मात्र, याकडे महानगरपालिका डोळेझाक करते याचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे.

पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळातच मध्यवर्ती भागांसह उपनगरांतील रस्त्यांची “चाळण’ झाली आहे. जोरदार पावसामुळे रस्त्यांची अवस्था “रस्त्यावर पाणी’ की “पाण्यात रस्ते’ अशी झाली होते. पण, याच रस्त्यांवरून वाहन चालवावे लागते. पर्यायाने वाहतूक कोंडी होते. अखेरीस वाहतूक विभागाने या परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यावर उपाययोजनेसाठी चक्क पाणी साचणाऱ्या ठिकाणांची (वॉटर लॉगिंग) आणि खड्ड्यांची यादीच पालिकेकडे पाठविली. मात्र, सद्यस्थितीवरुन पालिकेने कोठे उपाययोजना केल्या, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

डेक्कन – नटराज चौक, गरवारे पूल
शिवाजीनगर – संचेती चौक, वीर चापेकर चौक
कोथरुड – पौड फाटा, नळस्टॉप, इंदिरानगर, कोथरुड डेपो, कोकण एक्‍स्प्रेस चौक, सीडीएसएस चौक
वारजे – मुठा नदी ब्रीजवर, राजाराम पूल, वारजे जंक्‍शन, वाहतूक विभागाजवळील ड्रेनेज लाईन
समर्थ – रामोशीगेट चौक
लष्कर – खाणे मारुती चौक, दोराबजी चौक, लष्कर पोलीस स्टेशन चौक
स्वारगेट – ढोले पाटील चौक, वखार चौक, मार्केटयार्ड मेन गेट, शंकरशेठ रोड, गंगाधाम चौक
दत्तवाडी – दांडेकर पूल चौक, मित्रमंडळ चौक
सिंहगड रोड – राजाराम पूल, ब्रह्मा हॉटेल चौक
सहकारनगर – पुष्पमंगल चौक, महेश सोसायटी चौक
भारती विद्यापीठ – दत्तनगर भुयारी मार्ग
चतु:श्रृंगी – शिवाजी हौसिंग चौक, अभिमानश्री चौक (बाणेर)
खडकी – बाहु पाटील रेल्वे अंडरपास, चर्च चौक अंडरपास
विमानतळ – विमाननगर चौक, सोमनाथनगर चौक, खराडी दर्गा चौक, 509 चौक (गॅरिसन ऑफिस जवळ), विमानतळ गेट नं 2 आणि 3 समोर, दत्तमंदिर चौक
येरवडा – टिंगरेनगर गल्ली 7, गुंजन टॉकीज चौक, फुलेनगर आरटीओ चौक, प्रतिकनगर कॉर्नर

येथील खड्ड्यामुळे वाहतूक कोंडी
समर्थ – संत कबीर चौक, पॉवर हाऊस चौक, बॅनर्जी चौक
शिवाजीनगर – भारत इंग्लिश स्कूल समोर, कामगार पुतळा ते कोर्ट गेट 4
विश्रामबाग – झेड ब्रीज, गांजवे चौक, सेवासदन चौक, न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रस्ता
सहकारनगर – पासलकर सोसायटी, महेश सोसायटी, जय भवानी सोसायटी
स्वारगेट – मार्केटयार्ड चौक, जेधे चौक, वेगा सेंटर
भारती विद्यापीठ – गोकुळ नगर, वंडर सिटी, दत्तनगर
बंडगार्डन – मोरओढा चौक, सर्कीट हाऊस, साधु वासवानी चौक
लष्कर – जनरल वेउर रोड, वाय जंक्‍शन
कोथरुड – नळस्टॉप, एसएनडीटी
वारजे – वारजे जंक्‍शन, नदी पूल, चांदणी चौक, शिंदे चौक
खडकी – पोल्ट्री चौक, बोपोडी चौक, साई चौक
चतु:शृंगी – पाषाण रोड, औंध रोड, विद्यापीठ
विमानतळ – विमानतळ चौक, सोमनाथ नगर
हडपसर – फुरसुंगी रेल्वे ब्रीज, मंतरवाडी चौक, आयबीएम कंपनी
वानवडी – रामटेकडी, सोपान नगर, फातिमानगर, मम्मादेवी चौक, गोळीबार मैदानाजवळ
कोंढवा – खडीमशिन ते उंड्री, ब्रह्मा पेट्रोलपंप
मुंढवा – गांधीनगर
सिंहगड – संतोष हॉल, नवले ब्रीज

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.