बॅंकॉक – थायलंडची राजधानी बॅंकॉकच्या जवळच्या एका फॅक्टरीमध्ये झालेल्या एका स्फोटात किमान एक जण ठार झाला. तर 11 जण जखमी झाले आहेत. या स्फोटामुळे या फॅक्टरीच्या परिसरात विषारी वायूची गळती होण्याची भीती निर्माण झाली त्यामुळे हा परिसर रिकामा करण्यात आला.
जखमी झालेल्यांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. बॅंकॉकमधील सुवर्णभूमी विमानतळाजवळच्या फोम आणि प्लॅस्टिक पॅलेटुत्पादन करणाऱ्या फॅक्टरीमध्ये ही दुर्घटना घडली. या फॅक्टरीमध्ये झालेल्या स्फोटाने जवळपासच्या घरांच्या खिडक्यांची तावदानेही फुटली.
स्फोटामुळे लागलेल्या आगीवर नयंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाला हेलिकॉप्टरमधून पाण्याचा मारा करावा लागला. दुपारपर्यंत आगीवर नियंत्रण आणले गेले पण रासायनिक टॅंकला लागलेली आग धुमसत राहिली होती.