मुंबई – सुप्रसिद्ध रॅपर रफ्तार नेहमीच चर्चेत असतो. टीव्हीवरील ‘रोडीज’चे जज म्हणूनही तो चांगलाच प्रसिद्ध आहे.रफ्तारचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे. पण यावेळी रफ्तार चर्चेत येण्यामागे कारण त्याचे गाणे किंवा लुक नसून वैयक्तिक आयुष्य आहे.
रॅपर रफ्तारने पत्नी कोमल वोहरापासून घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. लग्नाच्या 6 वर्षांनंतर पत्नी कोमल वोहरापासून घटस्फोटासाठी त्याने अर्ज दाखल केला आहे. रॅपर रफ्तार आणि कोमल वोहरा यांनी डिसेंबर 2016 मध्ये लग्न केले होते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे जोडपे काही काळापासून एकमेकांपासून वेगळे राहत होते.हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, रफ्तार आणि कोमलने २०२० मध्येच घटस्फोटासाठी अर्ज केला होता . मात्र कोविडमुळे संपूर्ण प्रक्रियेला विलंब झाला.रफ्तार आणि कोमल वोहराला एका कॉमन फ्रेंडद्वारे भेटले होते. 2016 मध्ये लग्न करण्यापूर्वी दोघांनी पाच वर्षे डेट केले होते.
रफ्तार आणि कोमल यांच्या घटस्फोटाचे काम पुन्हा एकदा कायदेशीररित्या सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या बातमीने रफ्तारच्या चाहत्यांची मनं तुटली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आता रफ्तार आणि पत्नी कोमल 6 ऑक्टोबर 2022 रोजी घटस्फोटाच्या कागदपत्रांवर सही करतील. यानंतर दोघांचेही मार्ग कायमचे वेगळे होतील. मात्र या बातम्यांवर रफ्तारने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
रॅपर रफ्तारने आपल्या लग्नाचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. रफ्तारने फोटो शेअर करताना कॅप्शनही लिहिले आहे. त्याने फोटोला कॅप्शन दिले आहे, “Marrying my soulmate ️”. इतकेच नाही तर एका मुलाखतीत रफ्तारने कोमलला त्याला आणि त्याच्या प्रोफेशनला खूप पाठिंबा दिल्याचे श्रेय दिले.
मात्र आता त्यांच्या नात्यात अंतर इतके वाढले आहे की आता दोघांनीही एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केले आहे. या जोडप्याने त्यांच्या लग्नाचे फोटोही हटवले आहेत. कामाच्या आघाडीवर, रफ्तारने शेवटचे नुसरत भरुचाच्या जनहित में जरी या चित्रपटाचे शीर्षक गीत गायले. एमटीव्ही रोडीज या रिअॅलिटी शोमध्ये तो काही वर्षे गँग लीडर होता.