#पुन्हानिवडणूक? हॅशटॅगवर कलाकारांचे स्पष्टीकरण

मुंबई – सध्या राज्यात राजकीय वातावरण चांगले तापले असताना, सोशल मीडियावर #पुन्हानिवडणूक असं ट्विट करण्यात येतंय. निवडणुकी नंतर राज्यात कोणताही पक्ष सत्तास्थापन करू न शकल्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. अश्यातच मराठी कलाकारांकडून एकाचवेळी ट्विटरवर “#पुन्हानिवडणूक” असं ट्विट करण्यात आलं आहे.

अभिनेत्री सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, अकुंश चौधरी, सिद्धार्थ जाधव अशा अनेक कलाकारांनी सकाळी १०:३० ते ११ च्या दरम्यान #पुन्हानिवडणूक हा हॅशटॅग वापरत ट्विट केलं आहे. दरम्यान, कलाकारांनी केलेल्या या ट्विटमुळे त्यांच्यावर अनेक राजकीय नेत्यांनी निशाणा साधला होता. तसेच नेटकऱ्यांनी देखील चांगलेच ट्रोल केले आहे.

दरम्यान, टीका झाल्यानंतर मराठी कलाकारांकडून याबाबतचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. ‘आमची कुणाचीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न नाही, याबाबत लवकरच भूमिका मांडू” असे स्पष्टीकरण कलाकारांनी दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.