बॅंकॉक – ऑलिम्पिक पदक विजेत्या पी. व्ही. सिंधूने अखेर येथे सुरू असलेल्या जागतिक बॅडमिंटन सिरीज स्पर्धेच्या अखेरच्या सामन्यात विजय मिळवला. मात्र, तरीही या स्पर्धेतील भारतीय खेळाडूंचेआव्हान संपुष्टात आले.
सिंधूने शुक्रवारी झालेल्या सामन्यात पोर्वावीक शोकोवांग या 13 व्या मानांकित खेळाडूवर 21-18, 21-15 अशी मात केली. तिला या स्पर्धेच्या या महिन्यात झालेल्या सर्व फेऱ्यांतील सामन्यात पराभव स्वीकारावे लागले होते. तिच्यासह किदाम्बी श्रीकांतचेही आव्हान संपुष्टात आले आहे.
सायना नेहवाल यांच्यासह सात्विक साईराज रांकीरेड्डी, अश्विनी पोनाप्पा यांनी सुरुवातीला चमक दाखवली मात्र, त्यानंतर त्यांनाही स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले आहे.