नवी दिल्ली , वृत्तसंस्था : भारतीय आंब्यांना परदेशात देखील खूप मागणी आहे. हे आपण जाणतोच दरवर्षी मोठ्या प्रमाणात आंबा परदेशी पाठवला जातो. आतापर्यंत अमेरिका कॅलिफोर्निया, सॅन फ्रान्सिस्को, लॉस एंजेलिस, शिकागो या भागात आंबा पाठवला गेला आहे. मात्र आता युरोपातील देशांना देखील चवदार आणि रसदार भारतीय आंब्यांची चव चाखायला मिळणार आहे. नुकताच युरोपातील ब्रेसेल्स येथे मँगो फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला होता. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते शुक्रवारी या फेस्टिव्हल चे उदघाटन झाले. त्यामुळे आगामी काळात भारतीय आंब्यांची चव युरोपातील देशांना चाखायला मिळणार आहे.
Brussels, Belgium | Union Minister Piyush Goyal inaugurated 'Mango Festival' in Belgium on 17th June to create awareness among the Europeans and create a market for Indian mangoes in Europe pic.twitter.com/e6AkQngiWM
— ANI (@ANI) June 18, 2022
या फेस्टिव्हल मध्ये भारतीय आंब्यांची विविध प्रजाती होत्या. शिवाय भारतीय आंब्यांची चव चाखण्यासाठी तेथील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याची देखील माहिती मिळते आहे.महोत्सवाला मिळालेल्या प्रोत्साहानंतर युरोयपीय युनियनमधील भारतीय राजदूत यांनी येथील मार्केट बद्दल विश्वास व्यक्त केला आहे. या देशांमध्ये आंब्याला अफाट मागणी होईल असेही त्यांनी सांगितले आहे.भविष्यात युरोपियन बाजारात भारतीय आंबा विकला जाणार असा विश्वास पियुष गोयल यांनी व्यक्त केला आहे. त्यानिमित्ताने भारतीय आंबा उत्पादकांना ही फायदा होणार हे निश्चित.