नवी दिल्ली : देशात करोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच जाताना पाहायला मिळत आहे. त्यातच आता करोनाच्या संभाव्य चौथ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, देशात मागच्या 24 तासात 13 हजार 216 नवीन करोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशात सर्वाधिक नवीन रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. त्यानंतर राजधानी दिल्लीतील रुग्ण संख्येचा क्रमांक लागतो.
महाराष्ट्रात शक्रवारी दिवसभरात 4165 नवीन रुग्णांची नोद झाली आहे. तर दिल्लीमध्ये 1797 नवीन करोनाबाधितांची नोंद झाली आहे. देशातील सक्रिय करोना रुग्णांची संख्या वाढून 68 हजारांवर पोहोचली आहे. सध्या भारतात 68 हजार 108 रुग्ण करोनावर उपचार घेत आहेत.
गेल्या 24 तासांत 8 हजार 148 रुग्णांनी करोना विषाणूच्या संसर्गावर मात केली आहे. देशातील सक्रिय रुग्णांचा सरासरी दर 0.16 टक्के आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.63 टक्क्यांवर पोहोचले आहे.
देशात करोना आतापर्यंत एकूण 4 कोटी 26 लाख 90 हजार 845 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही नवीन आकडेवारी जारी केली आहे.