नवी दिल्ली – डिसेंबर 2019 ते नोव्हेंबर 2020 या काळात साखर कारखान्यांनी इंधन कंपन्यांना 170 कोटी लिटर इथेनॉल पुरवण्याचा करार केलेला आहे. त्यापैकी आतापर्यंत 92.5 कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे साखर कारखान्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होत आहे.
यासंदर्भात साखर कारखानदारांची संघटना असलेल्या इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने म्हटले आहे की, अतिरिक्त साखर तयार करून ती साठवून ठेवण्याचा खर्च कारखान्यांना परवडत नव्हता. आता इथेनॉलचा आधार मिळाल्यामुळे साखर कारखान्यांना पर्यायी आर्थिक स्रोत उपलब्ध झाला आहे. यावर्षी तेल कंपन्यांनी इंधनामध्ये पाच टक्के इथेनॉल मिसळले आहे. आगामी काळात ही परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे.