मुंबई – अभिनेत्री ईशा गुप्ता सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नुकतंच ईशाने सोशल मीडियावरून तिची बोल्ड स्टाईल चाहत्यांना दाखवली आहे. ईशाचा हा कातिल अंदाज पाहून चाहते देखील खुश झाले आहेत. साध्य फॅशनमध्ये देखील इशाचे सौंदर्य चांगलेच खुलून दिसत असल्याचे अनेक चाहत्यांचे म्हणणे आहे.
ईशा गुप्ताने शेअर केलेले फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.बोल्डनेसमुळे इशा तशीही नेहमी चर्चेत असते. फोटोमध्ये ईशाने घातलेले टाईट कॉश्यूम काहींना आवडलेले दिसत नाहीत म्हणूनच अनेकांनी ईशाचे कौतुक न करता तिला ट्रोलही केल्याचे दिसून येते. ईशाने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती एका ठिकाणी उभी असून तिने पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये ती थेट वाईन ग्लास घेऊन बसल्याचे पाहायला मिळते.
View this post on Instagram
या आधी देखील ईशाला आपल्या बोल्ड कपड्यांमुळे चाहत्यांनी ट्रोल केले होते. परंतु ईशवर ट्रोलिंगचा कोणताही प्रभाव दिसत नाही. तिला हवे तेव्हा ती आपल्या मर्जीप्रमाणे बोल्ड अंदाजात वावरत असते. सोशल मीडियावरील कमेंटला मीं गांभीर्याने घेत नसल्याचे या आधी देखील ईशाने वारंवार सांगितले आहे.