सातारा – लोणंद पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यात चौकशीसाठी आणलेल्या ऋतुराज भावज्या शिंदे (रा. काटकरवाडी, ता. खटाव) या संशयिताने स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयातून पलायन केले आहे. अधिक माहिती अशी, विविध गुन्ह्यांमध्ये हव्या असलेल्या संशयितांना पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने काल (दि. 16) रात्री कोम्बिंग ऑपरेशन राबवले.
त्यावेळी पोलिसांनी ऋतुराज शिंदे याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याला एलसीबीच्या कार्यालयात आणले होते. अटक करण्यापूर्वी त्याच्याकडून पोलीस माहिती घेत होते. यावेळी तो पोलिसांना चकवा देऊन तो पळून गेला. याबाबत शहर पोलीस ठाण्यात नोंद केल्याचे एलसीबीचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर यांनी सांगितले.