साताऱ्यात वृध्देचा गळा चिरून खून

सातारा (प्रतिनिधी) :  साताऱ्यातील कृष्णानगर येथे गजानन सोसायटीत केशव निवास येथे 65 वर्षीय वृद्धेचा धारधार शस्त्राने अज्ञात व्यक्तीने गळा चिरून हत्या केली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री (दि.१५) घडली.

जया गणेश गायकवाड-पाटील (वय 65) असे त्या वृद्धेचे नाव असून, घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सह पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल, सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किशोर धुमाळ हे दाखल झाले होते. तसेच डॉग स्कॉड, ठसे तज्ञ बोलवण्यात आले असून, पोलीस घटनेचा पुढील तपास घेत आहेत.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.