नवी दिल्ली – नोकरदारांसाठी आनंदाची बातमी आली आहे. 2020-21 या आर्थिक वर्षासाठी कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात 8.50 टक्के व्याज जमा करण्यात आले आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) 6.47 कोटी कर्मचाऱ्यांच्या खात्यांमध्ये व्याज जमा केल्याची माहिती ट्वीट करून दिली आहे.
6.47 crore accounts have been credited with an interest of 8.50% for the FY 2020-21. Next update on 15-11-2021. @LabourMinistry @esichq @PIB_India @byadavbjp @Rameswar_Teli @wootaum
— EPFO (@socialepfo) November 12, 2021
– मेसेजद्वारे जाणून घ्या पीएफची रक्कम
तुम्ही एसएमएसद्वारेही पीएफची शिल्लक तपासू शकता. यासाठी EPFO ने क्रमांक जारी केला आहे. यासाठी नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 7738299899 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. तुम्ही एसएमएस करताच, EPFO तुम्हाला तुमचे पीएफ योगदान आणि शिल्लक रकमेची माहिती पाठवेल.
एसएमएस पाठवण्याची पद्धतही खूप सोपी आहे. यासाठी तुम्हाला 7738299899 वर ‘EPFOHO UAN’ लिहून पाठवावे लागेल. ही सुविधा इंग्रजी, हिंदी, पंजाबी, गुजराती, मराठी, कन्नड, तेलुगु, तमिळ, मल्याळम आणि बंगाली अशा 10 भाषांमध्ये उपलब्ध आहे. या माहितीसाठी तुमचा UAN, PAN आणि आधार लिंक असणे आवश्यक आहे.
– मिस्ड कॉलद्वारे जाणून घ्या पीएफची रक्कम
आता तुम्ही फक्त एका मिस कॉलवर तुमच्या पीएफ खात्याचे सर्व तपशील जाणून घेऊ शकता. EPFO ने हा (011-22901406) क्रमांक जारी केला आहे. तुम्हाला फक्त तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून त्यावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. तुम्ही या नंबरवर कॉल करताच, काही सेकंदांची रिंग वाजल्यानंतर फोन डिस्कनेक्ट होईल आणि त्यानंतर मेसेजद्वारे खात्याची संपूर्ण माहिती पोहोचेल.
जर तुम्हाला इंग्रजीमध्ये संदेश पाठवायचा असेल तर तुम्हाला EPFOHO UAN ENG लिहावे लागेल. शेवटचे तीन शब्द (ENG) म्हणजे भाषा. हे तीन शब्द टाकले तर शिल्लक रकमेची माहिती इंग्रजीत मिळेल. तुम्ही हिंदीचा कोड (HIN) टाकल्यास तुम्हाला हिंदीत माहिती मिळेल. लक्षात ठेवा की UAN ऐवजी तुम्हाला तुमचा UAN नंबर टाकण्याची गरज नाही. फक्त UAN टाइप करून सोडा.
– उमंग अॅपवरूनही कळेल पीएफची रक्कम
तुम्ही उमंग अॅपद्वारे पीएफ खात्यात जमा केलेली रक्कम देखील तपासू शकता. यासाठी UMANG अॅपवरील EPFO विभागात जा. त्यानंतर Employee Centric Service वर क्लिक करा. view passbook निवडा आणि पासबुक पाहण्यासाठी UAN सह लॉगिन करा. तसेच तुम्ही 1800-118-005 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकता.
ईपीएफओच्या नियमांनुसार, फोन कॉल किंवा मेसेजद्वारे, त्याच ग्राहकांना माहिती मिळेल, ज्याचा यूएएन सक्रिय असेल. यासोबतच, जर तुमचा UAN तुमच्या कोणत्याही बँक खात्याशी, आधार आणि पॅनशी जोडलेला असेल, तर तुम्ही खात्याचे सर्व तपशील जाणून घेऊ शकता.