पुणे – स्पोर्टसफिल्ड मॅनेजमेंट तर्फे पहिल्या ऑक्सिरीच करंडक 100 बॉल अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 23 नोव्हेंबरपासून लिजंड्स क्रिकेट मैदान, मुंढवा येथे होणार आहे, अशी माहिती स्पोर्टसफिल्ड मॅनेजमेंटचे संचालक सनी मारवाडी यांनी दिली आहे.
या पहिल्या 100 बॉल क्रिकेट स्पर्धेत स्थानिक क्रिकेट क्लब स्तरावरील संघ सहभागी होऊ शकणार आहे.
साखळी आणि बाद फेरीमध्ये व लेदर चेंडूवर होणाऱ्या या स्पर्धेत एकूण दोन लाख रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेला माणिकचंद ऑक्सिरीच यांनी आर्थिक पाठिंबा दिला आहे.