पुणे – खोल समुद्रातील मासळीची आवक वाढली आहे. सोमवारपासून मार्गशीर्ष सुरू झाला आहे. या काळात अनेक जण मांसाहार करत नाही. यामुळे खोल मासळीच्या भावात 10 ते 20 टक्के घट झाली आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे चिकन आणि मटणाचे भाव स्थिर आहेत. तर मागणी वाढल्याने इंग्लिश आणि गावरान अंडीच्या शेकड्याच्या भावात 30 ते 40 रुपयांनी वाढ झाल्याची माहिती व्यापारी रुपेश परदेशी आणि प्रभाकर कांबळे यांनी दिली.
गणेश पेठ येथील मासळी बाजारात रविवारी (दि.13) खोल समुद्रातील मासळीची सुमारे 15 ते 16 टन, खाडीची सुमारे 200 ते 400 किलो तर नदीच्या मासळीची 2 ते 3 टन आवक झाली. तर, आंध्रप्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे 15 ते 20 टन आवक झाली असल्याची माहिती व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली.
खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव) : पापलेट : कापरी : 1200-1300, मोठे 1400, मध्यम : 800, लहान 600- 650, भिला : 500-550, हलवा : 400, सुरमई : 360-400, रावस : लहान 440 मोठा : 550-600, घोळ : 550, भिंग : 360, करली : 200-240, करंदी : सोललेली 400, पाला : लहान 700, मोठे : 1200-1300, वाम : 480-700, ओले बोंबील : 140-160, कोळंबी ः लहान 280, मध्यम 400-480, मोठे 550, जंबोप्रॉन्स : 1200, किंगप्रॉन्स : 750, लॉबस्टर : 1200, मोरी : 240-280, मांदेली : 100, राणीमासा : 160-200, खेकडे : 280-320, चिंबोऱ्या : 550.
खाडीची मासळी : सौंदाळे : 280-320, खापी : 240, नगली : लहान 240, मोठी 600, तांबोशी : 360-400, पालू : 280, लेपा : लहान 120- 160 मोठे 240, शेवटे : 200, बांगडा : लहान 160-200 , मोठे 240-280 , पेडवी : 80, बेळुंजी : 440-160, तिसऱ्या : 240-280, खुबे : 120-160, तारली : 160-180, नदीची मासळी : रहू :160 कतला : 180, मरळ :480, शिवडा : 240, खवली : 240, आम्ळी :120-160, खेकडे : 200 वाम : 550
चिकन : चिकन : 200, लेगपीस : 240 जिवंत कोंबडी : 160, बोनलेस : 300.
अंडी : गावरान : शेकडा : 870, डझन : 120, प्रति नग : 10, इंग्लिश : शेकडा : 501 डझन : 66 प्रतिनग : 5.5
मटण : बोकडाचे : 640 बोल्हाईचे : 640 खिमा : 640, कलेजी : 640.