मुंबई – बॉलीवूड आणि स्पोर्टस इंडस्ट्रीत सर्वाधित चर्चित आणि क्यूट जोडीपैकी विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे सर्वांचे फेवरेट आहेत. हे त्यांच्या चाहत्यांचेच नव्हे, तर जगभरातील लोकांचे मानणे आहे. त्याचे झाले असे की, टॉप-25 ग्लोबल इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर्सची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.
या यादीत अनुष्का आणि विराट यांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. ही यादी ग्लोबल डेटा कलेक्शन आणि ऍनालिसिस करणाऱ्या कूशि र्अीवळीीें ने प्रसिद्ध केली आहे. जगभरातील लोकांना प्रभावित करणाऱ्या सेलेब्सच्या यादीत विराट कोहली अकराव्या स्थानावर आहे. याच बरोबर या यादीत सर्वाधिक रॅकिंग घेणारा तो भारतीय ठरला आहे.
तसेच अनुष्का शर्मा ही 24व्या क्रमांकावर आहे. ही यादी तयार करताना 1000 सेलिब्रिटींच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरील त्यांच्या प्रेक्षकांचा दर्जा आणि ऑथेंटिक यंगेजमेंटवर रॅंकिंग देण्यात आले आहे. हे सेलिब्रेटी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या मदतीने जागरूकता, सशक्तीकरण, स्वत:ला प्रेरित करण्यास किती सक्षम आहेत हे पाहिले गेले.
तसेच सोशल मीडियावर त्यांची उपस्थितीही दखल घेण्यात आली आहे. दरम्यान, अनुष्का आणि विराट हे सध्या आपल्या पहिल्या बाळाच्या आगमनाच्या प्रतीक्षेत आहेत. या जोडप्यांनी नुकतीच तिसरी ऍनिव्हर्सरी साजरी केली होती. हे दोघे जण 11 डिसेंबर 2017 रोजी इटलीत विवाहबंधनात अडकले होते.