मेलबर्न : आन्या श्रुबसोलच्या तीन विकेटच्या आणि नताली स्किवरच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडच्या महिला संघाने तिरंगी टी-२० क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात भारतीय महिला संघावर ४ विकेटनी विजय मिळवला. इंग्लंडची गोलंदाज आन्या श्रुबसोल सामनावीर ठरली.
Natalie Sciver's 38-ball 50 helps England secure a four-wicket win in Melbourne!
They have now climbed to the top of the points table 🙌
Follow here: https://t.co/enb7Ad7sMF pic.twitter.com/eKjhPV14TF
— ICC (@ICC) February 7, 2020
भारतीय महिला संघाने विजयासाठी दिलेले १२४ धावांचे इंग्लंडने १८.५ षटकांत ६ विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केले. इंग्लंडकडून फलंदाजीत नताली स्किवरने ५०(३८), फ्राॅन विलसनने नाबाद २०(२२), हीथर नाइटने १८(२०) आणि डेनियल वाट हिने १४(१६) धावांची खेळी केली. भारतीय संघाकडून राजेश्वरी गायकवाडने ३ तर राधा यादवने १ विकेट घेतली.
India have finished their innings at 123/6 in Melbourne.
Anya Shrubsole starred for England with 3/31! pic.twitter.com/NXwjc2Rvm7
— ICC (@ICC) February 7, 2020
तत्पूर्वी, इंग्लंडने टाॅस जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारले होते. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने स्मृति मंधानाच्या ४५(४०), जेमिमा रोड्रिग्जच्या २३(२०) आणि हरमनप्रीत कौरच्या १४(२३) धावांच्या खेळीच्या जोरावर २० षटकांत ६ बाद १२३ धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून गोलंदाजीत आन्या श्रुबसोलने ३, कैथरीन ब्रूंटने २ आणि सोफी एक्लेस्टोन हीने १ विकेट घेतली.
Tri-nation series timeline so far:
1️⃣: India beat England by 5 wickets
2️⃣: England beat Australia in Super Over
3️⃣: Australia beat India by 4 wickets
4️⃣: England beat India by 4 wickets
5️⃣: Australia vs India – ❓
6️⃣: Australia vs England – ❓FINAL: ❓ vs ❓ pic.twitter.com/nqdXiruoaE
— T20 World Cup (@T20WorldCup) February 7, 2020
दरम्यान, या विजयासह इंग्लंडचा संघ ३ सामन्यातील २ विजयासह ४ गुण मिळवून गुणतालिकेत पहिल्या स्थानी आहे तर भारताला या तिंरगी स्पर्धेत ३ सामन्यापैकी २ सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. भारताचा संघ २ गुणासह तिस-या स्थानी आहे. आॅस्ट्रेलियाच्या संघाला १ विजय आणि १ पराभव पत्कारावा लागला असून ते दुस-या स्थानी आहेत.