पोपटराव पवार, नरेंद्र जाधव, एस.के. जैन, राहिबाई पोपेरे, गिरीश प्रभुणे, विनोद शहा यांचा समावेश
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे देण्यात येणारे जीवनसाधना गौरव पुरस्कार जाहीर झाले असून, यावर्षी त्यात ग्रामविकासाच्या क्षेत्रात भरीव कार्य करणारे श्री. पोपटराव पवार, बीजांच्या स्थानिक प्रजातींचे जतन करणाऱ्या श्रीमती राहिबाई पोपेरे, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव, भटक्या-विमुक्तांच्या विकासासाठी कार्यशील असलेले श्री. गिरीश प्रभुणे, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेले, शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष अॅड. एस. के. जैन आणि जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य उभारणारे डॉ. विनोद शहा यांचा समावेश आहे.
या सहाही जणांना विद्यापीठाच्या वर्धापन दिनी (१० फेब्रुवारी २०२०) हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.