पुणे: बार कौन्सील ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या शिस्तपालन समितीच्या अध्यक्षपदी ऍड. वाय.जी.ऊर्फ आबासाहेब शिंदे यांची निवड झाली आहे.अॅड. शिंदे हे पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष असून, पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस लीगल सेलचे अध्यक्ष म्हणूनही ते कार्यरत आहेत. या निवडीमुळे त्यांचे वकील, विविध वकील संघटनांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.